मोतीलाल फिरोदिया बुध्दीबळ आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे उदघाटन संपन्न
अहमदनगर, 4 मे (हिं.स.):- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित
मोतीलाल फिरोदिया बुध्दीबळ आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे उदघाटन संपन्न


अहमदनगर, 4 मे (हिं.स.):- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शुभारंभ बुद्धिबळ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय लाकडी बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले.

बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट,विश्वस्त पारुणात ढोकळे,खजिनदार सुबोध ठोंबरे,शाम कांबळे,संजय खडके,प्रकाश गुजराती,दत्ता घाडगे,नवनीत कोंठारी,देवेंद्र ढोकळे,सुनील जोशी,अनुराधा बापट,डॉ.स्मिता वाघ, रोहिणी आडकर,पंच प्रवीण ठाकरे,शार्दुल टापसे,यशवंत पवार आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात,आंध्र प्रदेश,दिव,दमन,गोवा,तमिळनाडू इत्यादी राज्यातून ३६० खेळाडूं सहभागी झाले असून १७२ आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू आहे.इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वय स्कर खेळाडूंनी देखील सहभाग नोंदविला आहे.बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी केले.बुद्धिबळ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की,बुद्धिबळ खेळाडूंना दरवर्षी दोन आंत ररा्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात.यावर्षी आजच्या स्पर्धेपासून नवीन १०० लाकडी चेस बोर्ड यावर सर्व खेळाडू आपल्या बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी व खेळण्यासाठी देण्यात येणार आहे आहे.ही संकल्पना राज्या त कुठेही नसून ही फक्त आपल्या अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटने कडे असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande