नाशिक - शिक्षक मतदार संघासाठी सरासरी 84.86 टक्के मतदान
नाशिक, २६ जून, (हिं.स)ल - विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी झालेल्या मतदानात सरासरी 84
नाशिक - शिक्षक मतदार संघासाठी सरासरी 84.86 टक्के मतदान


नाशिक, २६ जून, (हिं.स)ल - विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी झालेल्या मतदानात सरासरी 84.86 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदान नंदुरबार येथे 90.25 टक्के झाले आहे.या निवडणुकीची अंतिम आकडेवारी ही सर्व मतपेट्या उद्या सकाळी जमा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नगर नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये 90 मतदान केंद्रांवर ती मतदान झाले या निवडणूक प्रक्रियेचा विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन आढावा घेतला तर कोणताही अडचणी येऊ नये यासाठी म्हणून स्वतः महसूल उपायुक्त विठ्ठल सोनवणे हे देखील लक्ष ठेवून होते.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी आज 26 जून रोजी सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीसाठी 69 हजार 368 मतदार आहेत त्यामध्ये 46 हजार503 पुरुष तर 22 हजार 865 महिला मतदार आहेत.

या निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत असून काँग्रेस मधून ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेल्या संदीप गुळवे विद्यमान आमदार किशोर दराडे अहमदनगर मधून बिपिन कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनवणे यांच्यामध्ये लढत होत आहे.

या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार शिगेला पोहोचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन प्रचाराची रणनीति आखली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ती शिक्षकांना दारू मटण याच्याबरोबरच पैठणी पैशाचे पाकिटे, सोन्याच्या नथी आणि मोठ्या कॉलिटी चे पेन देण्यात आले. यातूनच काल मंगळवारी मनमाड आणि येवल्यामध्ये पैशाचे वाटप करताना अहमदनगर मधील खोले समर्थकांना अटक करण्यात आली आहे अशीच परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील झालेली आहे. या ठिकाणी देखील एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या निवडणुकीमध्ये सायंकाळी मतदान संपल्यानंतर या निवडणुकीसाठी सरासरी 84.86 टक्के मतदान झाले. सुमारे 58 हजार 869 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात 90.25 , धुळे जिल्ह्यामध्ये 86.59 ,जळगाव जिल्ह्यात 83.81 नाशिक जिल्ह्यामध्ये 85.35 आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 82.62 टक्के मतदान झाले. या सर्व मतपेट्या नासिक येथील अंबड वेअर हाऊस येथे जमा करण्यात येणार असून त्या ठिकाणी एक जुलै रोजी मतदानाची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती उपयुक्त विठ्ठल सोनवणे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande