नाशिक : शिवसैनिकाला मतदान केंद्राबाहेर पैसे वाटताना पकडले
नाशिक, २६ जून (हिं.स.) : शिक्षक मतदार संघामध्ये मतदानाच्या दिवशीही पैसे वाटताना शिंदे गटाच्या उमेदवा
नाशिक : शिवसैनिकाला मतदान केंद्राबाहेर पैसे वाटताना पकडले


नाशिक, २६ जून (हिं.स.) : शिक्षक मतदार संघामध्ये मतदानाच्या दिवशीही पैसे वाटताना शिंदे गटाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते पकडले गेले असून यामध्ये एकाला पकडण्यात आले असून दोन जण फरार झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पैशाचा किती पाऊस पडला हे समोर आलेले आहे दरम्यान या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने या सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

बुधवारी विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी मतदान झाले या मतदानाच्या वेळी देखील शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटामध्ये सहभागी झालेले विद्यमान आमदार किशोर दराडे यांची दादागिरी आणि शेवटपर्यंत चालू होती त्यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामध्ये शिक्षकांना गुलाम म्हटले होते त्यामुळे त्यांच्याविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे असे असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मंगळवारी पैसे वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने करण्यात आला त्याच्याशी काही भागांमध्ये त्यांचे कार्यकर्ते पकडले गेले होते पण हे कमी होते की काय यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी बुधवारी मतदानाच्या वेळी नाशिक शहरातील बिडी भालेकर शाळेतील मतदान केंद्राबाहेर त्यांचे काही महिला व आणि पुरुष कार्यकर्ते तैनात केलेले होते हे कार्यकर्ते मतदारांना भेटून त्यांच्याकडून दराडे यांना मतदान करण्यासाठी स्लिप आणि पैशाचे पाकीट देत असल्याचे समोर आले सुरुवातीला ही घटना समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समज दिली आणि त्यानंतर त्यांनी हे काम थांबवले होते.दुपारी बारा वाजे नंतर पुन्हा या कार्यकर्त्यांनी हे काम जोमाने सुरू केले आणि ही बाब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना रंगी हाथ पकडून दिले . ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी पैसे वाटप करताना एकाला पकडले मात्र दोन जण यावेळी झालेल्या गडबडीत फरार झाले.यामध्ये काही महिला देखील सहभागी होत्या त्या पण त्या महिलांना ज्यावेळी या भानगडीची माहिती मिळाली त्यावेळी त्या देखील तेथून पळून गेल्या.

त्यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला नेले त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान या घटनेवरून ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला लक्ष केले असून आपला पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी पैशाचे वाटप केले आणि निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यातून काहीही साध्य होणार नाही कारण मोठ्या प्रमाणावर ती दराडे यांच्या विषयी नाराजी आहे आणि त्याचे फळ हे त्यांना मिळणार आहे.तर ठाकरे गट शिवसेनेचे नेते आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जेष्ठ संचालक वसंत गीते यांनी सांगितले की मागच्या वेळी देखील दराडे यांनी महामोर पैशाचा पाऊस पडला आणि निवडून आले होते यावेळी देखील त्यांनी पैशाच्या जोरावरती दादागिरी करत निवडून येण्याचा जो प्रयत्न केला आहे हा चुकीचा आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande