मुंबई, 23 जुलै, (हिं.स.) 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे. लीला एका मिशन मध्ये इतकी गुंतली आहे की २४ तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे. जो आहे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्या मागचा सूत्रधार कोण आहे? सध्यातरी किशोरमुळे शंकेची सुई एजे वरच आहे. लीलाला पुरावे शोधण्यासाठी किशोरकडून सतत फोनवरून दबाव येत आहे. लीला पुरावा शोधण्यासाठी अंतराच्या कपाटाजवळ जाते आणि तेवढ्यात एजे तिला पाहतो आणि तिच्यावर रागावतो. एजे कडे एक अनमोल लॉकेट आहे ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे आणि एजे ते फक्त अंतराच्या वाढदिवसाला बाहेर काढतो. श्वेता अंतराच्या फोटोच्या जागी त्या लॉकेटमध्ये लीलाचा फोटो लावते. जेव्हा ते लॉकेट एजेच्या हातात येतं तेव्हा तो भयंकर चिडतो आणि लीलाला शिक्षा द्यायचं ठरवतो. लीलाला एजे कडून काय शिक्षा मिळेल ? इकडे एजेला त्याच्या व्यावसायिक भागीदाराकडून रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्याला लीलासोबत तिथे जायचे आहे, किशोरही त्यांच्या मागे जातो, तिथे एक अपघात होण्यापासून तो लीलाला वाचवू शकेल? काय आहे अंतराच्या मृत्यूमागचं सत्य? किशोर त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल ? ह्या सर्व प्रशांच्या उत्तरासाठी पहायला विसरू नका 'नवी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर