नाशकात राज्य सबज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धेला मोठया उत्साहात सुरुवात
नाशिक, २५ जुलै, (हिं.स.) : नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि केनसिंगटन क्लब आणि निवेक क्लब यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपथ्याखाली आयोजीत योनेक्स सुपर शाइन महाराष्ट बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेला मोठया उत्साहात
नाशकात राज्य सबज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धेला मोठया उत्साहात सुरुवात


नाशिक, २५ जुलै, (हिं.स.) : नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि केनसिंगटन क्लब आणि निवेक क्लब यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपथ्याखाली आयोजीत योनेक्स सुपर शाइन महाराष्ट बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेला मोठया उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन केनसिंगटन क्लब, नाशिकचे संचालक विक्रम मते, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सहसचिव सिदार्थ पाटील, निवेक क्लबचे सचिव शैलेन्द्र वैश्य, यांच्या हस्ते अन नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. शर्मिला कुलकर्णी, जिल्हा सचिव आणि स्पर्धा सचिव पराग एकांडे, उपाध्यक्ष योगेश एकबोटे,मुख्य पंच विवेक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पर पडले.

यावेळी बोलतांना विक्रांत मते यांनी सांगितले की, युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून खेळाडूंनी याचा लाभ घेऊन प्रगती करावी असे सांगितले. या स्पर्धेत १५ वर्षे आणि १७ वर्षे मुले आणि मुली या दोन वयोगटांचा समावेश आहे. या स्पर्धा एकेरी, दुहरी आणि मिश्र दुहेरी अश्या तीन प्रकारात खेळविल्या जात आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकून सुमारे ८८३ खेळाडूंचा सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

उद्घाटनांनंतर पहिल्या फेरीच्या सामन्यांना सुरवात झाली. या स्पर्धा केनसिंगटन क्लबच्या सहा आणि सातपूर, एम. आय. डी. सी. येथील निवेक क्लबच्या तीन अद्ययावत वूडन कोर्टवर खेळविण्यातयेत आहेत. आज झालेल्या १५ वर्षे मुलींच्या एकेरी स्पर्धेत वाशिमच्या अनन्या शिंदेने नागपूरच्या सान्वी घाटे हीचा १७-१५ आणि १५-०४ असा पराभव करून विजय मिळविला.

नाशिकच्या प्रीशा पाटीलला पालघरच्या प्राची वाघमारेकडून आणि ठाण्याच्या कनक यादवला पुण्याच्या शिवानी मसलीकर यांच्याकडून पुढे चाल मिळाली. तर सातारच्या अनन्या काटेने पुणेच्या महिका पाठकला १५-१०. १५-०४ असे पराभूत केले. नाशिकच्या शरवी कोरडेला ठाणेच्या धन्वी नायरने २-० असे पराभूत केले. पुणेच्या शरयू रांजणे, अदविका पवार, आर्या कुलकर्णी यांनी आपले पहिले सामने जिंकून विजयी सलामी दिली.

मुलांच्या १५ वर्षे गटामध्ये पहिल्या सामन्यामध्ये नाशिकच्या साद शेख याने रत्नागिरीच्या सुमेध सुर्वे याला अतिटतीच्या लढतीत २-१ असे पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये १५ -१५ अश्या बरोबरी नंतर सादने सलग दोन गुण मिळवत हा सेट १७-१५ जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये त्याला ०९-१५ असे पराभूत व्हावे लागले. तिसऱ्या सेटमध्येही चांगली चुरस दिसून आली. १२-१२ अश्या बरोबरीनंतर सादने दोन गुण मिळवत हा सेट १५-१३ असा जिंकून आपला पहिलं विजय साजरा केला. पुणेच्या५ सिद्धार्थ पिणीकरने सांगलीच्या विष्णु लोहकरेला १५००७,१५-०९ असे पराभूत केले. ठाणेच्या अद्वैत आढावने नाशिकच्या तनिष पवारला अतिटतीच्या लढतीत १७-१५, १५-०९ असे पराभूत केले. नाशिकच्या निकुंज पाटीलने नाशिकच्याच शंतनू सोनवणेला चुरशीच्या लढतीत १३-१५, १५-०५ आणि १५-०६ असे २-१ ने पराभूत केले. नाशिकच्या निशांत थकरेने अहमदनगरच्या अलेस्टर अब्राहमला १५-१२ १५-०५ असे पराभूत करून विजयी सलामी दिली. नाशिकच्या अरुष काळेला कोल्हापूरच्या चैतन्य तरे याचकडून पुढे चल मिळाली. या स्पर्धेत पुणे, नागपूर, ठाणे आणि मुंबईच्या खेळाडूनी चांगला खेळ करून विजय मिळविले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI / मेघा माने / सुधांशू जोशी


 rajesh pande