अहमदनगर : शालेय फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूल विजेता
अहमदनगर, 6 सप्टेंबर (हिं.स.)। नगर शहरात सावेडी परिसरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फुटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींचा फुटबॉल संघ शालेय फुटबॉल स्पर्धेत अजिंक्य राहिला.शहरातील वाडिया पार्कच्या
शालेय फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूल विजेता


अहमदनगर, 6 सप्टेंबर (हिं.स.)।

नगर शहरात सावेडी परिसरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फुटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींचा फुटबॉल संघ शालेय फुटबॉल स्पर्धेत अजिंक्य राहिला.शहरातील वाडिया पार्कच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेत शहरातील एकूण १९ शाळेच्या फुटबॉल संघाने सहभाग घेतला होता.

शाळेचे खेळाडू चंद अशोक,चंद भानुदास व सय्यद आफिया,पवार निलम यांनी शाळेच्या फुटबॉल संघांना विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत उपांत्य सामन्यात ओएएसआयएस इंग्लिश मीडियम शाळेच्या फुटबॉल संघाचा २-१ ने पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.आणि अतितटीच्या अंतिम सामन्यात साई इंग्लिश मीडियम शाळेच्या फुटबॉल संघाचा २-० ने पराभव करून विजेता संघ ठरला.आणि विभागीय स्पर्धेसाठी फुटबॉल संघाची निवड झाली.तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाने सुद्धा उत्कृष्ट अशी कामगिरी करत उपांत्य सामन्यात रेसिडेन्सील हायस्कूलच्या फुटबॉल संघाचा १-० ने पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.आणि आयकॉन पब्लिक स्कूलच्या फुटबॉल संघाचा ३-० ने पराभव करून मुलींच्या फूटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला. आणि विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघानेही आपल्या कौशल्याने उत्तम कामगिरी बजावली उपांत्य सामन्यातसाई इंग्लिश मिडीयम स्कूल फूटबॉल संघाचा ४-० ने पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.आणि अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या फुटबॉल संघाशी चुरशीची लढत देऊन ३-० ने सामना जिंकला.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande