नाशिक - मराठा हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन
नाशिक , 6 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र माध्यमिक शिक्षणाधिकारी प्
मराठा हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन


नाशिक , 6 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मविप्र माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रा. डॉ.भास्कर ढोके, जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जयकुमार पवार, हँडबॉल असोसिएशनचे सचिव संजय पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे महेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल, रामनाथ रायते उपस्थित होते.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मराठा हायस्कूल नाशिक तसेच नाशिक जिल्हा हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७, आणि १९ वर्षांखालील मुलांच्या नाशिक ग्रामीण व मनपा जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठा हायस्कूलचा क्रीडा क्षेत्रातील चढता आलेख स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडेदेखील लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. क्रीडाशिक्षक अनिल उगले यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडाशिक्षक राजाराम पोटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande