मुंबईत टॉवरच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग; एकाचा मृत्यू, ३ जखमी
मुंबई, २५ जुलै (हिं.स.) : बोरिवली येथील कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आगीची माहिती मिळता
बोरीवलीत टॉवर ला आग


मुंबई, २५ जुलै (हिं.स.) : बोरिवली येथील कनकिया समर्पण टॉवरच्या सहाव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही, शॉर्ट सर्किट हे संभाव्य कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील रहिवाशांनी आग विझवण्यासाठी मदत केली असून, घटनास्थळी तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा तत्परतेने काम करत आहेत आणि या घटनेचा तपास सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / मनीष कुलकर्णी


 rajesh pande