मनोज जरांगेची अकोल्यात सभा
अकोला, 7 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे यांची अकोला जिल्हात सभा होणार आहे. 29 सप्टेंबर ही सभेची संभाव्य तारीख असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आह
P


अकोला, 7 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे यांची अकोला जिल्हात सभा होणार आहे. 29 सप्टेंबर ही सभेची संभाव्य तारीख असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची अकोल्यात सभा होणार असल्याने सभेला महत्व प्राप्त झालं आहे.

या सभेत आरक्षण आणि विधानसभा निवडणुक यावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात सभांचा धडाका सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनचा भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला. मराठा समाजाने विरोधात केलेल्या मतदानामुळे महायुतीचे उमेदवार विजयापासून वंचित राहिले. लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एका आंदोलनचे हत्यार उपसले. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात यश मिळविले. मात्र, जरांगे पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा सभा घेण्याचा धडाका सुरु केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासह विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात जरांगे पाटील हे सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यात देखील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अकोल्यात सभा होणार असल्याचे निश्चित झालं आहे. 29 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याची माहिती आयोजक राजेश देशमुख यांनी दिली. 29 सप्टेंबर ही सभेची संभाव्य तारीख आहे. त्यानुसार सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेऊन तारीख निश्चित केली जाईल. तारीख सध्या निश्चित नसली तरी सभा मात्र होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ही सभा अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवितात की, आणखी कोणती भूमिका ते स्पष्ट करतात ते विविध ठिकाणी सभा घेऊन जाहीर करण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande