अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही ! गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
जळगाव, 7 सप्टेंबर (हिं.स.) जळगावात हातपंप व वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी युनियनतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ झाला. यावेळी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्यावर टीका केलीय.गुलाबराव पाटील म्हणाले की, अर्थखात्यासारखं नालायक खातं
अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही ! गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र


जळगाव, 7 सप्टेंबर (हिं.स.) जळगावात हातपंप व वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी युनियनतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ झाला. यावेळी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्यावर टीका केलीय.गुलाबराव पाटील म्हणाले की, अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी देखील पक्का आहे. गेली फाईल की फॉलोअपसाठी माणूस पाठवायचो. मी पिच्छाच सोडला नाही. याच पाठपुराव्यामुळे आमचं कामं झालं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. फॉलोअप घेणारे लोकं माझ्या सोबत नसते तर कदाचित मी फाईलकडे दुर्लक्ष केलं असंत, असंही ते म्हणाले.तसेच दोन अडीच महिन्यांत येणाऱ्या विघ्नासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थ ही करावा लागतो. आमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी लोकांनाही सांगा. मला खात्री आहे की तुम्ही न सांगता ते सांगाल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तुम्ही आज मला सन्मानासाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, वडील काँग्रेसचा प्रचार करत होते, मी बाळासाहेबांच्या सेनेचा प्रचार करत विजयी झालो. सरकारमध्ये राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही. पाणी पुरवठा खातं आले आणि आमच्या लोकांना महत्व आहे. जनतेला पाणी पाजण्याचं काम करण्याचे भाग्य मला मिळालं. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचं आहे. मी देवदुत नाही, गरीबी जवळून पाहिली. कष्ट करणाऱ्याचे पैसे खाणाऱ्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असंही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande