जळगाव - अवैध गुटखा वाहतूक, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, 26 जुलै, (हिं.स.) - मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारी स्कॉरपिओ गाडी आणि 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मि
जळगाव - अवैध गुटखा वाहतूक, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, 26 जुलै, (हिं.स.) - मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारी स्कॉरपिओ गाडी आणि 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की, एक काळ्या रंगाची महेंन्द्रा स्कॉरपिओ MH- 27 DL 2496 या गाडीमधील चालक हा अवैधरित्या सुगंधी तंबाखु व गुटखा वाहतुक करुन घेवुन जात आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली.

या माहितीनुसार त्यांनी पो.उप.निरी.राहुल बोरकर, पो.उप.निरी. राजेंन्द्र खनके, पो.हे.कॉ छोटु वैद्य, पो.ना.कॉ देवसिंग तायडे, पो.कॉ विशाल सपकाळे, निखील नारखेडे अशांना सदर गाडीवर कारवाई करा असे आदेशित केल्याने वरील पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर रोडवरील स्मशान भुमी समोरील रोडवर पोहचुन तेथे पोलिसांनी नाकाबंदी करुन, वाहनांची तपासणी करीत असतांना एक काळ्या रंगाची महेंन्द्रा स्कॉरपिओ कार दुरुन येत असल्याचे दिसले ते वाहन जवळ आल्याने त्या वाहनाला पोलिसांनी हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केला असता.

दरम्यान चालकाने वाहन रोडच्या कडेला थांबवीले. ती गाडी महेंन्द्रा स्कॉरपिओ असुन त्याचा क्रमांक MH-27 DL 2496 असा दिसुन आला, वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजीज शेख बाबु (वय 36 रा. झॉसी नगर, रिसोड ता. रिसोड जि. वाशिम) असे सांगीतले. त्यास त्याचे गाडीमध्ये काय माल आहे याबाबत विचारले असता त्याने गाडीत गुटखा असल्याचे सांगीतले व त्याचे ताब्यातुन महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन विक्री, वितरण व साठा तसेच वाहतुक यासाठी प्रतिबंधीत केलेल्या गुटखा आणि गाडी असा मुद्देमाल एकुण 22,38,050/- रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखु, गुटखा व वाहन असा मुद्देमाल मिळुन आला.

त्यावरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी विजय कचरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दिनांक 29/07/2024 पोलीस कोठडी मंजुर केली आहे व सध्या आरोपी पोलीस कोठडी मध्ये आहे.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर / हर्षदा गावकर


 rajesh pande