भंडारा पोलिसांनी पकडला 167 किलो गांजा
भंडारा, 6 सप्टेंबर (हिं.स.)। भंडारा पोलिसांनी 167 कीलो गांजा पकडला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांना माहिती मिळाली की, उडीसा वरुण xuv गाडी मध्ये गांजा भरून येत आहे. त्या आधारे रात्री पोलिसांनी गस्त लावली. वाहनांची तपासणी सुरू केली असता अखेर एका वाह
Ganja


भंडारा, 6 सप्टेंबर (हिं.स.)। भंडारा पोलिसांनी 167 कीलो गांजा पकडला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांना माहिती मिळाली की, उडीसा वरुण xuv गाडी मध्ये गांजा भरून येत आहे. त्या आधारे रात्री पोलिसांनी गस्त लावली. वाहनांची तपासणी सुरू केली असता अखेर एका वाहनात मागच्या डीक्कित प्लॅस्टिक बोरीमध्ये काहीतरी असल्याचं आढळून आलं. त्याला उघडल्यावर त्यात गांजा दिसून आला. लगेच पोलिसांनी गांजा गाडी सह दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अम्ली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande