भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त
जळगाव, 6 सप्टेंबर, (हिं.स.) भुसावळमधून मोठी बातमी समोर आलीय. भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश
भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त


जळगाव, 6 सप्टेंबर, (हिं.स.) भुसावळमधून मोठी बातमी समोर आलीय. भुसावळात तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, रा. अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचून बनावट नोटांसह बुधवारी तिघांना अटक केली.

संशयित एक लाखाच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande