अकोल्याच्या भाजप कार्यकर्त्यांचा अमरावतीत अपघात, दोघे ठार, दोन जखमी
अकोला, 26 जुलै (हिं.स.)। अमरावती येथे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला. यामध्ये अकोला शहरामधील मोठी उमरी भागात राहणारे विजय मदनकार आणि नकुल तोडकर यांचा जागीच मृत्यु झाला. तर त्यांच्या सोबत प्रवास करणारे दोन गंभीर जखमी
Photo


अकोला, 26 जुलै (हिं.स.)। अमरावती येथे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला. यामध्ये अकोला शहरामधील मोठी उमरी भागात राहणारे विजय मदनकार आणि नकुल तोडकर यांचा जागीच मृत्यु झाला. तर त्यांच्या सोबत प्रवास करणारे दोन गंभीर जखमी तर एक जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरिता अकोला येथून वॅगनार कारने ( कार क्रमांक MH 30 - 3999) पाच इसम अमरावतीला गेले होते. या दरम्यान प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार आटोपून गौरी इन हॉटेल येथे जेवण करायला गेले. तेथून जेवण झाल्यानंतर अकोला मार्गाकडे जात असताना कार चालकाने आपली कार विरुद्ध दिशेच्या मार्गावरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिव्हिल लाईन मोठी उमरी जिल्हा अकोला येथे राहणारी व्यक्ती 50 वर्षीय विजय जगन्नाथ मदनकर, 36 वर्षीय नकुल विजय तोडकर यांचा मृत्यू झाला. तर संदीप माणिक गावंडे, मुकेश सराफ गंभीर जखमी झाले असून, यासोबतच एक इसम जखमी झाले.

जोरदार धडकेने वॅगनार कार समोरील भागाचे नुकसान झाले. रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याने क्रेनच्या साह्याने वॅगनार कारला बाजूने करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ सह गाडगे नगर, अमरावती पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतक एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर येत आहेत. दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. धडक कोणत्या वाहनाने दिली याचा शोध नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे / मनीष कुलकर्णी


 rajesh pande