माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक
मुंबई, 26 जुलै, (हिं.स.) मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. २८.०७.२०२४ (रविवार) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानक
माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक


मुंबई, 26 जुलै, (हिं.स.) मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. २८.०७.२०२४ (रविवार) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०२.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

डाउन जलद मार्गावर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२० वाजता सुटणार आहे.

ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.०३ वाजता सुटणार आहे.

अप जलद मार्गावर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी ३.५९ वाजता पोहोचेल.

सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळून)

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि

ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

डाउन हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.१६ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी ४.३६ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.१७ वाजता सुटेल आणि ११.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून ४.१० वाजता सुटेल आणि ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वी पनवेल येथे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल.

ब्लॉकनंतर पनवेल येथे जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुपारी ४.५२ वाजता पोहोचेल.

अप ट्रान्स-हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ११.३३ वाजता पोहोचेल.

ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सायंकाळी ५.२० वाजता पोहोचेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल असतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / हर्षदा गावकर


 rajesh pande