राज्यस्तरीय सबज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धेत पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबईच्या खेळाडूची आगेकूच
नाशिक, २६ जुलै, (हिं.स.) - नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि केनसिंगटन क्लब आणि निवेक क्लब यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपथ्याखाली आयोजीत योनेक्स सुपर शाइन महाराष्ट्र बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेच्या आजच्या दु
राज्यस्तरीय सबज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धांत पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबईच्या खेळाडूची आगेकूच.


नाशिक, २६ जुलै, (हिं.स.) - नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि केनसिंगटन क्लब आणि निवेक क्लब यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपथ्याखाली आयोजीत योनेक्स सुपर शाइन महाराष्ट्र बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकेरीचे सामने खेळविले गेले. या स्पर्धेत पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, मुंबईच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. १५ वर्षे मुलींमध्ये प्रथम मानांकन असलेल्या नाशिकच्या दर्शिता राजगुरूने आपल्या लौककस साजेसा खेळ करून उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या गटामध्ये अनन्या शिंदे(नागपूर), ऋतिका कांबळे(कोल्हापूर), शरयू रांजणे(पुणे), अदविका पवार(पुणे), आर्या कुलकर्णी (पुणे),अनन्या बोंदरे(पुणे) प्रांजल शिंदे(पालघर), गार्गि दाभोळकर(मुंबई), आर्या मेस्त्री(मुंबई), आयूषी मुंडे (पुणे), गाथा सूर्यवंशी, सई कदम(पुणे)प्राजक्ता गायकवाड(पुणे), साची संचेती(पुणे), सारा पेशाकर(नागपूर), श्रावणी बामांनकर(पालघर), पूर्वी मालिक(नागपूर), आयूषी काळे(पुणे) यांनी आपले सामने जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले.

मुलांच्या १५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात पुण्याच्या प्रथम मानांकित सचित त्रिपाठीने अपेक्षे प्रमाणे आपला दूसरा सामना जिंकून उपूपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तरसिद्धार्थ पिणीकर(पुणे), अनवीत नेणे(ठाणे), शिवम चौरे, तनिष्क अडे(पुणे), अनय एकबोटे(पुणे), सैराज नायसे (नागपूर), अर्पित रादासानी(पुणे), सौरश काणे(पुणे),एल.अभिज्ञान सिन्हा(पुणे) सात्विक काळे (अकोला), चैनमाय फणसे (पुणे ० मयूरेश भूकते (०मुंबई), कृत्य पटेल (ठाणे ० यांनी आपले सामने जिंकून उप उपांत्य पूर्व फेरी गाठली.

१७ वर्षे मुलींमध्ये एकेरी प्रकारात प्रथम मानाकीत नागपूरच्या शौर्या मांडवीने आपल्या दारघळ साजेसा खेळ करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याचबरोबर टियान कास्तीलेनो(मुंबई), काशवी शहा (सांगली) श्रावणी बामांकर(पालघर), पूर्वा मूडाळे(पुणे) श्रेया थोरात (सांभाजीनगर), ऋषा परब(मुंबई), अनन्या शिंदे (वाशिम), आर्या कुलकर्णी(पुणे) आयूषी मुंडे(पुणे) जान्हवी शहा(मुंबई), दर्शित राजगुरू (नाशिक) कयरा निझवान (पुणे) यानी आपले सामने जिंकून उपउपांत्य पूर्व फेरी गाठली. १७ वर्षे मुलांमध्ये एकेरी प्रकारात अर्जुन रेड्डी, एल. अभिज्ञान, अधीश, मयूरेश भुक्ती, ओजास जोशी, मार्गशीष आव्हाड पार्थ देवरे यांनी आपले सामने जिंकून उपउपांत्य पूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. १५ वर्षे मिश्र दुहरे प्रकारात नील लांजेवार आणि ग्रीष्म केशलवार या नागपूरच्या जोडीने केदार देशपांडे आणि इरा कपिला या पुण्याच्या जोडीचा सरल डू सेटमध्ये पराभव करून विजय मिळविला. तर अथर्व गवळी आणि अनन्या देशपांडे या पुण्याच्या जोडीने आर्यन राठोड आणि अनन्या सोळे या अहमदनगर च्या जोडीचा पराभव करून विजय मिळविला.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI / हर्षदा गावकर


 rajesh pande