नाशिक - ज्यादा मतपत्रिका प्रकरणी दोन तहसीलदार व एका बीडीओला नोटीस
नाशिक, 26 जुलै,( हि.स). - नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांपेक्षा जास्त मते पत्रिका सापडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी दोन तहसीलदार आणि एका गटविकास अधिका-याला नोटीस दिली आहे. नुकत्याच संपलेल्य
नाशिक - ज्यादा मतपत्रिका प्रकरणी दोन तहसीलदार व एका बीडीओला नोटीस


नाशिक, 26 जुलै,( हि.स). - नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांपेक्षा जास्त मते पत्रिका सापडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी दोन तहसीलदार आणि एका गटविकास अधिका-याला नोटीस दिली आहे.

नुकत्याच संपलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अतिशय रोमांचकारी झाली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक या नात्या वादाने गाजत होती. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू देण्यात आल्या. पैशाचा गैरवापर करण्यात आला. उघडपणे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु त्याबाबत कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी तर पैसे वाटप वस्तू वाटप यावरून काही लोकांना पकडण्यात आले त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आणि त्याबाबतच्या तक्रारी देखील दाखल झालेल्या आहेत.

तर मतमोजणी च्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा एक दोन मतपत्रिका जास्त सापडल्या. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल घेऊन महाविकास आघाडीच्या सह अन्यविरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. तर याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी हा जो गोंधळ उडाला होता त्यावर आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील भाऊसाहेब आरात आणि नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तहसीलदार आबा महाजन यांच्यासह निफाडचे गटविकास अधिकारी संदीप पाटील यांना नोटिसा जारी केल्या आहेत. या तिघांनाही पुढील पंधरा दिवसांमध्ये खुलासा करावयाचा असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांकडे मतदारसंघापेक्षा अधिक मतपत्रिका मतपेटीत कशी आली मतपत्रिकांच्या वाटपात काही प्रकार झाला आहे का आधीची माहिती मागवली आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI / हर्षदा गावकर


 rajesh pande