राजस्थान : विहिंपच्या केंद्रीय समितीची बैठक 27 पासून
जोधपूर. 26 जुलै (हिं.स.) : राजस्थानच्या जोधपूर येथे शनिवारी 27 जुलै पासून विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय कार्यकारी समितीची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. विहिंपचे सरचिटणीस बजरंग बगरा यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात बगरा म्हणाले की, बेकायदेशीर धर्
VHP-LOGO


जोधपूर. 26 जुलै (हिं.स.) : राजस्थानच्या जोधपूर येथे शनिवारी 27 जुलै पासून विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय कार्यकारी समितीची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. विहिंपचे सरचिटणीस बजरंग बगरा यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भात बगरा म्हणाले की, बेकायदेशीर धर्मांतरण, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्ती, लोकसंख्या असंतुलन, स्वयंरोजगार, स्वावलंबन, सेवा, समरसता, हिंदू निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या प्रगतीचा आढावा, कुंभाच्या तयारीसह महिला सक्षमीकरण, कौटुंबिक प्रबोधन आणि हिंदू मूल्यांवर सातत्याने होणारे हल्ले अशा अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. संघटनात्मक दृष्टीने तयार करण्यात आलेल्या सर्व 45 प्रांतांतील विहिंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीच्या सुमारे 340 केंद्रीय, प्रांतीय आणि क्षेत्रीय पदाधिकारी या बैठकीला हजेरी लावणार आहेत. राजस्थानच्या ऐतिहासिक जोधपूर शहरातील रातानाड़ा रोड येथील माहेश्वरी जन उपयोगी भवन येथे आयोजित या बैठकीत परदेशातील विहिंपचे सुमारे डझनभर पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमीला विश्व हिंदू परिषदेचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्य विहिंपच्या षष्टिपूर्ति समापन कार्यक्रमाचा कृती आराखडाही या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande