पात्र महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा - अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.) : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात २ ऑगस्टपासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोह
अब्दुल सत्तार


छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.) : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात २ ऑगस्टपासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावे, असे निर्देश पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यंत्रणेला दिले.

माहिती देण्यात आली की, शुक्रवार २ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री सत्तार यांनी महिलांशी संबंधित योजनांचा आढावा घेतला.

महिला लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांचे सशक्तीकरण करणे हे शासनाचे ध्येय्य असून त्याच्या पूर्ततेत यंत्रणांनी योगदान द्यावे, असे सत्तार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करतांना प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी काम करावे,असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम जिल्ह्यात उत्तम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / सुधांशू जोशी


 rajesh pande