हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी शाळेत जागरुकता सत्राचे आयोजन
हिंगोली, 27 जुलै (हिं.स.)। महिला व बालविकास विभाग युनिसेफ व एस.बी.सी.3 यांच्या संयुक्त वि‌द्यमाने हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन प्रकल्प 2020 पासून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार बालविवाहात हिंगोली जिल्हा पाचव्या क
हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी शाळेत जागरुकता सत्राचे आयोजन


हिंगोली, 27 जुलै (हिं.स.)। महिला व बालविकास विभाग युनिसेफ व एस.बी.सी.3 यांच्या संयुक्त वि‌द्यमाने हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन प्रकल्प 2020 पासून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार बालविवाहात हिंगोली जिल्हा पाचव्या क्रमांकावर असून बालविवाह निर्मूलनासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून 2024-25 या शैक्षणिक वर्षात महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने व युनिसेफ आणि एस.बी.सी. 3 यांच्या आर्थिक सहाय्याने स्थानिक भागीदार संस्था उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली यांच्या संयुक्त वि‌द्यमाने 125 शाळांमध्ये 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण व त्यांच्या पालकांसोबत एक ते दीड तासाचे जागरुकता सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या सत्र घेतले जात असून, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संदिप सोनटक्के, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

यासाठी 40 स्थानिक स्वयंसेविकांची निवड करून या स्वयंसेविकांना युनिसेफ व एस.बी.सी.3 यांच्यामार्फत नांदेड येथे दोन दिवशीय प्रशिक्षण दिले. या 40 प्रशिक्षित स्वयंसेविकांना शाळेत जावून 6 वी ते 10 वी च्या वि‌द्यार्थ्यांसोबत वि‌द्यार्थी सक्षमीकरण सत्र घेत आहेत. प्रथम विद्यार्थी सत्र घेतल्यावर 4 जेंडर चॅम्पियन (वि‌द्यार्थिनी) व 1 मार्गदर्शक शिक्षिकेची निवड मुख्याध्यापकांसोबत चर्चा करून केली जात आहे.

या मार्गदर्शक शिक्षिका बालविवाहासंदर्भात शाळेतील कार्यक्रमास मदत करतील व याबाबत विविध स्पर्धांचे आयोजन करणार आहेत. जेंडर चॅम्पियन विद्यार्थिनींना स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रथम वेळीमध्ये बॅज दिले जात आहेत. प्रथम सत्र झाल्यानंतर स्वयंसेविका पुढील कालावधीत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी मुख्याध्यापकांसोबत चर्चा करून नियोजन करण्यात येत आहे. ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये द्वितीय उजळणी सत्राचे आयोजन करण्यात येईल. या विद्यार्थी सक्षमीकरण सत्र व पालक जागरूकता सत्रास वि‌द्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / सुधांशू जोशी


 rajesh pande