हिंगोली : जैविक बुरशीनाशकाची अधिकृत विक्री केंद्रावरुनच खरेदी करावी
हिंगोली, 27 जुलै (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी संशोधित केलेले बायोमिक्स नावाचे जैविक बुरशीनाशक जमिनीतून पिकांना उद्भवणाऱ्या रोगावर चांगले उपाय म्हणून वापरले जाते. विशेषतः कंदवर्गीय पिके जशी हळद, अद्रक या पिकावर याचा मोठ्
हिंगोली : जैविक बुरशीनाशकाची अधिकृत विक्री केंद्रावरुनच खरेदी करावी


हिंगोली, 27 जुलै (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी संशोधित केलेले बायोमिक्स नावाचे जैविक बुरशीनाशक जमिनीतून पिकांना उद्भवणाऱ्या रोगावर चांगले उपाय म्हणून वापरले जाते. विशेषतः कंदवर्गीय पिके जशी हळद, अद्रक या पिकावर याचा मोठ्या प्रमाणात उपयोग शेतकरी करत आहेत. हे जैविक बुरशीनाशक दोनशे रुपये किलो याप्रमाणे विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. परंतु काही व्यक्तीकडून या जैविक बुरशीनाशकाची बोगसरित्या तयार करून अवैधरीत्या विक्री करत असल्याचे समजते.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून किंवा त्यांचे अधिकृत विक्री केंद्र जसे कृषी महाविद्यालय गोळेगाव तालुका औंढा किंवा कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी येथे त्यांनी विक्री केंद्रास परवानगी दिली आहे, त्या ठिकाणाहूनच शेतकऱ्यांनी खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच काही कृषी सेवा केंद्रावरून किंवा काही व्यक्तीकडून अशा प्रकारे विनापरवाना अवैधरित्या विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / सुधांशू जोशी


 rajesh pande