लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी 2013 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्री
लातूर जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन


लातूर, 27 जुलै (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी 2013 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे.

आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्यवर्धिनी केंद्रातंर्गत एनक्यूएएसची विस्तृतपणे आठ विभागातंर्गत तपासणी केली जाते. सेवा तरतूद, रुग्णांचे हक्क, इनपुट, सहाय्य सेवा, क्लिनिकल केअर, संक्रमण नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम इत्यादीबाबत सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारणे, तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातंर्गत गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये घ्यावयाची काळजी, नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटूंब कल्याण, संसर्गजन्य रोग व्यवस्थापन, किरकोळ घटकांसह साध्या आजाराचे व्यवस्थापन, असंसर्गजन्या रोग व्यवस्थापन, सामान्य नेत्ररोग आणि कान, नाक, घसा काळजी, मुख आरोग्य काळजी, वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्याच्या आजारांचे व्यवस्थापन आदी सेवांबाबत दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे केंद्रस्तरावरुन एनक्यूएएस बाह्य मुल्यांकन कर्त्यामार्फत पाहणी करण्यात आली.

उदगीर तालुक्यातील किणी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा, लातूर तालुक्यातील पाखर सांगवी, अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा, औसा तालुक्यातील सारोळा, जळकोट तालुक्यातील घोणशी या आठ आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन आरोग्य विभागातील सर्वोच्च दर्जाचे मानांकन असून आरोग्यवर्धिनी केंद्राना सलग तीन वर्षे 12 सेवांसाठी प्रत्येकी 18 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 16 हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / सुधांशू जोशी


 rajesh pande