पॅरिस ऑलिम्पिकचे नेत्रदीपक वातावरणात दिमाखदार उद्घाटन
* पीव्ही सिंधू आणि शरथ कमल भारताचे ध्वजधारक * जवळपास १० हजार खेळाडू सहभागी * लाखो प्रेक्षकांनी अनुभवला 'याचि देही याचि डोळा' सोहळा पॅरिस, २७ जुलै (हिं.स.) : पॅरिसच्या सीन नदीकाठी ऑलिम्पिक २०२४ सोहळ्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात, नेत्रदीपक व
उद्घाटन


उद्घाटन


घोडा


लेडी गागा


लेडी गागा


भारतीय संघ


भारतीय संघ


लाईट शो


* पीव्ही सिंधू आणि शरथ कमल भारताचे ध्वजधारक

* जवळपास १० हजार खेळाडू सहभागी

* लाखो प्रेक्षकांनी अनुभवला 'याचि देही याचि डोळा' सोहळा

पॅरिस, २७ जुलै (हिं.स.) : पॅरिसच्या सीन नदीकाठी ऑलिम्पिक २०२४ सोहळ्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात, नेत्रदीपक वातावरणात पार पडला. या निमित्ताने फ्रान्सने आपल्या सांस्कृतिक वारशाचे दिमाखदार प्रदर्शन दाखवून दिले.

ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकचा सोहळा नदीतीरावर होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भारतीय संघाची संचलनावेळी ओळख करून देण्यात आली. ऑलिम्पिक परेडमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर आहे. यावेळी पीव्ही सिंधू आणि शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते. संचलनावेळी भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला. मध्यरात्री १.१५ च्या सुमारास फ्रान्स संघांची बोट सर्वांसमोर आली. यजमान फ्रान्सचे ५०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सरभागी होणार आहेत. फ्रान्स संघाच्या संचलनावेळीही पाऊस येत होता.

सर्व संघांच्या संचलनानंतर अखेरीस ऑलिम्पिकच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि शांतता व एकतेचा संदेश देणाऱ्या घोड्याच्या प्रतिकृतीने सीन नदीवरून दौड केली. दरम्यान ऑलिम्पिकचा ध्वज फडकवण्यात आला आणि ऑलिम्पिक अँथम झाले. यानंतर आयफेल टॉवरवर लाईट शो दाखवण्यात आला. दरम्यान काही देशांचे संचालन झाल्यानंतर प्रसिद्ध लेडी गागा हिचा परफॉर्मन्स झाला. तिच्या आगळ्या वेगळ्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

शेवटी फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू झिनेदिन झिदानने ऑलिम्पिक मशाल स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालकडे सोपवली, त्याने ती सेरेना विलियम्सकडे सोपवली. यानंतर सीन नदीतून सेरेनाने माजी फ्रेंच टेनिसपटू एमेली मुरेस्मोकडे मशालीची जबाबदारी दिली. तिने पुढे टोनी पार्करकडे सोपवली. यासह एक एक खेळाडूने ती मशाल हाती घेतली. अखेरीस १०० वर्षीय माजी सायकलिस्ट चार्ल्स कोस्टे यांनी मशाल टेडी रिनरकडे सोपवली, ज्याने हॉट बलूनच्या आजूबाजूची आग पेटवली. त्यानंतर सेलिन डिऑनचा परफॉर्मन्स झाला आणि ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा संपला आणि स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात झाली.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात जगभरातून जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होत आहेत. सीन नदीवर आठ किमी अंतरावर बोटीतून खेळाडूंचे संचलन पार पडले. हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लाखो प्रेक्षकांनी हा सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवला.

भारतीय खेळाडूंनी अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी - सचिन तेंडुलकर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही खास संदेश दिला. सचिनने पोस्टमध्ये म्हटले की 'ऑलिम्पिक स्पर्धा नेहमीच एकता आणि उत्तमतेचा महोत्सव असतो. पॅरिस ऑलिम्पिक सुरू होतंय, तर आपल्या १४० कोटी हृदयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देऊया. जा आणि आम्हाला अभिमान वाटेल अशी

कामगिरी करा.'

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande