अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा : मुख्यमंत्री
मुंबई, २७ जुलै (हिं.स) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे पाणीपातळीत वाढ हो
मुख्यमंत्री


मुंबई, २७ जुलै (हिं.स) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या आणि आवश्यकता भासल्यास सेनादलाची मदत उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्यास सांगितले आहे. प्रशासनाने सतर्क राहून ऑनफिल्ड सज्ज राहावे, लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचनाही दिल्या आहेत.

पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी


 rajesh pande