संबंधित विभागांनी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत तत्काळ पोहचवावी - मुख्यमंत्री
मुंबई, २७ जुलै (हिं.स.) : बेलापूरमधील शहाबाज गावातील सेक्टर १९ मध्ये आज पहाटे एक इमारत कोसळल्याने गंभीर दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी तातडीने संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्य
संबंधित विभागांनी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत तत्काळ पोहचवावी - मुख्यमंत्री


मुंबई, २७ जुलै (हिं.स.) : बेलापूरमधील शहाबाज गावातील सेक्टर १९ मध्ये आज पहाटे एक इमारत कोसळल्याने गंभीर दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी तातडीने संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आणि सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती मदत तत्काळ पोहचवावी, असे आदेश दिले आहेत.

दिल्लीतील निती आयोगाच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनद्वारे निर्देश दिले की, इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात यावी. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, आपत्तीग्रस्तांना त्वरित उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी


 rajesh pande