भंडाऱ्यात भरधाव बसने दुचाकीस्वाराला चिरडले
भंडारा, ०६ जुलै, (हिं.स.) - भंडारा जिल्ह्यात अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. तुमसर वरून भंडारा कड
भंडाऱ्यात भरधाव बसने दुचाकीस्वाराला चिरडले


भंडारा, ०६ जुलै, (हिं.स.) - भंडारा जिल्ह्यात अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. तुमसर वरून भंडारा कडे भरधाव वेगात येणाऱ्या बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना खरबी गावाजवळ घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. जिवन गोमासे (३०) रा.खरबी असे मृतकाचे नाव आहे. तर, अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande