नगर : हायकोर्टाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीत सामावून घेण्याची मागणी
अहमदनगर, 6 जुलै (हिं.स.):- अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त पदी सौरभ जोशी यांची राज्य शासनाच्
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीत सामावून घ्यावे


अहमदनगर, 6 जुलै (हिं.स.):- अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त पदी सौरभ जोशी यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने सत्कार करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घेण्यात यावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उच्च न्यायालय यांनी लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या वारस नोकरींसाठी वारसा हकाने नोकरी भरती करण्याच्या कामी स्थगिती आदेश दिलेला होता.या आदेशामध्ये दुरुस्ती करून न्यायालयाने १०/०४/२०२३ रोजी मेहेतर,वाल्मिकी आणि भंगी समाजातील सफाई काम करणान्या कामगारांना वारस नोकरी देणेयायत आदेश दिले होते.त्या आदेशामध्ये उच्च न्यायालय यांनी २४/०५/२०२४ रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत.या आदेशामध्ये न्यायालयाने शेड्युल्ड कास्ट (अनु. जाती) व नवबौद्ध या प्रवर्गातील वारस नोकरी देणेबाबत आदेश दिलेले आहेत.तसेच १०/०४/२०२३ च्या आदेशाप्रमाणे जर या कर्मचार्यांचे वारसांचे व विहीत वयोमर्यादचे पुढे गेले असल्यास त्यांना सामावून घेणेचा आदेश देण्यात आलेले आहेत.तरी अहमदनगर महानगरपालिकेने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार व न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तातडीने नोकरीवर सामावून घेण्यात यावे,अशी मागणी यावेळी कर्मचारी युनियनच्या वतीने प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande