आ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या वसुलीत संगमनेर तालुका प्रथम
अहमदनगर, 6 जुलै (हिं.स.):- काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
आ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या वसुलीत संगमनेर तालुका प्रथम


अहमदनगर, 6 जुलै (हिं.स.):- काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून समृद्धी निर्माण करत विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी सेवा सोसायट्यां मध्ये आपल्या कर्ज फेडीची परंपरा कायम ठेवत ८९.७० टक्के इतकी वसुली देत जिल्ह्यात प्रथम क्रमांक राखला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे यांनी दिली आहे.

जिल्हा बँक वसुली बाबत माहिती देताना ॲड कानवडे पुढे म्हणाले की,सहकार हे गोरगरिबांच्या विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेर तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली असून राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून सर्व क्षेत्रात अग्रभागी राहिला आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू असून सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, गोर गरीब यांना बँकेने सातत्याने कर्ज पुरवठा केला आहे.आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे या बँकेवर जिल्ह्यातील सर्व सभासद,ठेवीदार,शेतकरी यांचा मोठा विश्वास आहे.संगमनेर तालुक्याने आपल्या कर्जफेडीची उज्वल परंपरा कायम ठेवत तालुक्या तील ४ सेवा सोसायटी यांनी मेंबर पातळीवर शंभर टक्के वसुली दिली आहे.यामध्ये घुलेवाडी,म्हसवंडी,निमगाव टेंभी व निंबाळे या गावांचा समावेश आहे.तर इतर ८१ सेवा सोसायटी यांनी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली दिली आहे.यामुळे तालुक्याची वसुली ही ८९.७० टक्के राहिली असून अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा कर्ज वसुलीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमध्ये सातत्याने प्रबोधन करताना आमदार बाळासाहेब थोरात व माजी आ डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात व चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे,संचालक गण पतराव सांगळे,मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे,तालुका विकास अधिकारी अशोक थोरात,वसुली अधिकारी उल्हास शिंदे,कार्यालयीन अधीक्षक सुखदेव पचपिंड,तालुका सचिव प्रकाश कडलग यांचेसह विविध पदाधिकाऱ्यांनी गावोगावी सातत्याने बैठका घेऊन कर्ज वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे.यामुळे तालुक्याची कर्ज वसुली ही ८९.७० टक्के इतकी झाली आहे.या सर्व वसुली कामांमध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक मंडळ,सचिव,जिल्हा बँकेचे शाखाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना,संगमनेर तालुका दूध संघ,शेतकी संघ,मार्केट कमिटी या संस्थांनी ही कर्जदार शेतकऱ्यांचा वसुली करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.जिल्हा बँकेच्या या वसुलीच्या परंपरेबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात,माजी आ.डॉ.सुधीर तांबे,आ.सत्यजित तांबे,बाजीराव पा.खेम नर,ॲड.माधवराव कानवडे,गणपतराव सांगळे,इंद्रजीत थोरात,युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात,दुर्गा तांबे,रणजीतसिंह देशमुख,बाबा ओहोळ,शंकरराव खेमनर,संपत डोंगरे,सुधाकर जोशी आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande