रनिंग स्पर्धेत नागपुरच्या धावपटूने मारली बाजी
गोंदिया, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिसामा गावातील श्री. युवा गणेश मंडळाने गणेश उत्सवाचे औचित्य साधून रनिंग स्पर्धेचे आयोजन केले असून नागपुरातील धाव पट्टूने या स्पर्धेत बाजी मारत पहिला क्रमांक पटकवीला. श्री. य
रनिंग स्पर्धेत नागपुरच्या धावपटूने मारली बाजी


गोंदिया, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिसामा गावातील श्री. युवा गणेश मंडळाने गणेश उत्सवाचे औचित्य साधून रनिंग स्पर्धेचे आयोजन केले असून नागपुरातील धाव पट्टूने या स्पर्धेत बाजी मारत पहिला क्रमांक पटकवीला.

श्री. युवा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात रनिंग स्पर्धे सह महिला सक्ष्मीकरण. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जातं असून विविध सामाजिक उपक्रम हा गणेश मंडळ राबीत आहे. क्रीडा क्षेत्रातील तरुण तरुणीना योग्य संधी उपलब्ध व्हावी तसेच गोंदिया सारख्या आदिवासी नक्षल ग्रस्थ जिल्ह्यातील तरुण तरुणी देखील क्रीडा क्षेत्रात देश पातळीवर नाव लोखीक करावे या उद्देशाने उपक्रम राबवित असतात.

तर या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातून तसेच नागपुरातील आलेल्या धाव पट्टू नी मंडळाचे आभार मानत अस्या पद्धतीच्या स्पर्धेचे आयोजन दर वर्षी करण्यात यावे अशी विनंती मंडळा कडे केली आहे. स्पर्धेत 5 वर्षा च्या चिमुकल्या शह 25 च्या वयोगटातील तरुण तरुणीनी हजेरी लावली असून विजयी स्पर्धाकांना रोख रक्कम आणि मोमेन्टो देवून गौरविण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande