रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ पुरुष, महिला वैयक्तिक जलतरण स्पर्धेत गोगटे कॉलेजचे यश
रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : मुंबई विद्यापीठ आणि प्रगती महाविद्यालय (डोंबिवली, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष/महिला जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन
जलतरण स्पर्धेत गोगटे कॉलेजचे यश


रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : मुंबई विद्यापीठ आणि प्रगती महाविद्यालय (डोंबिवली, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष/महिला जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजेते विद्यार्थी असे - पुरुष संघात करण मिलके २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कास्य पदक, अथर्व देसाई - ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहावा क्रमांक तर महिला संघात तनया मिलके हिने ५० मी. बॅक स्ट्रोक - सुवर्ण पदक, २०० मीटर बॅक स्ट्रोक रौप्य पदक, ४०० मी फ्री स्टाईल - रौप्य पदक, २०० मी. बटरफ्लाय रौप्य पदक, २०० मी आय एम कास्यपदक. या विद्यार्थ्याचे संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande