नाशिक : स्ट्राइकिंग स्ट्रायडर्सची मॅरेथॉन उत्साहात संपन्न
नाशिक , 16 सप्टेंबर (हिं.स.)। स्ट्राइकिंग स्ट्रायडर्स वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत अमन कुमार (वयोगट १६-३५) याने १० कि.मी. अंतर ३१:०८ मिनिटांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर बसंती कुमारी (वयोगट १६
नाशिक : स्ट्राइकिंग स्ट्रायडर्सची मॅरेथॉन उत्साहात संपन्न


नाशिक , 16 सप्टेंबर (हिं.स.)। स्ट्राइकिंग स्ट्रायडर्स वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत अमन कुमार (वयोगट १६-३५) याने १० कि.मी. अंतर ३१:०८ मिनिटांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर बसंती कुमारी (वयोगट १६-३५) हिने ३७:४१ मिनिटांत शर्यत पूर्ण करत महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला. नाशिक मॅरेथॉनचे हे पहिले वर्ष असून स्पर्धेत १५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात हॉटेल ग्रीन व्हियू येथून सकाळी ६ वाजता झाली. नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चौहान, गीता चौहान, त्रिमूर्ती आणि लाईफ सेल डायग्नोस्टिकचे संचालक डॉ. प्रमोद अहिरे, ऑलिम्पियन कविता राऊत, एम व्हि पी सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे विजेंद्र सिंग व इतर मान्यवरांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सर्व १० कि.मी. पुरुष आणि महिला स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ कि.मी. इतर महिला व पुरुष वेगवेगळ्या वयोगटातील विजेत्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन सर्व प्रायोजकांचा देखील ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सह प्रायोजक स्ट्राइकिंग स्ट्रायडर्स वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या त्रिमूर्ती लाईफ सेल डायग्नोस्टिक नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत अमन कुमार (वयोगट १६-३५) याने १० कि.मी. अंतर ३१:०८ मिनिटांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर बसंती कुमारी (वयोगट १६-३५) हिने ३७:४१ मिनिटांत शर्यत पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा जिंकली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande