काँग्रेसकडून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून गायकवाड यांच्यावर गुन्हा द
P


अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी सोमवारी काँग्रेस कडून शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचे वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

राहुल गांधी या देशात आरक्षण संपण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या खरा चेहरा आज लोकांच्या समोर आलेला आहे. मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता आरक्षण संपवणार आहे, असं सांगता. आरक्षण संपवण्याची भाषा तुम्ही करून राहिले. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपवणार, असे म्हणत बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे.

सोमवारी सकाळी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले कि, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मत मागितले. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी ११ लाख रुपये देणार, असे गायकवाड म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर बुलढानाय्त पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या आमदार गायकवाडचा निषेध व्यक्त करीत कारवाई साठी पोलिसात टाकणार दाखल करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात सायंकाळी बुलढाण्यात शहर पोलिसात हि तक्रार नोंदविण्यात आली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यन आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande