आरोग्य विद्यापीठातर्फे आयोजित रिल स्पर्धेस 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता रिल स्पर्धेस दि. 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य विज्
आरोग्य विद्यापीठ


नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता रिल स्पर्धेस दि. 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धत सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धबाबत विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर स्पर्धेची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे.

या स्पर्धत सहभागी स्पर्धकाने लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण,सामाजिक सुधारणा, पर्यावरण संवर्धन, कर प्रणाली, महसुल प्रणाली, जलसंधारण, वास्तुकला व शिल्पशास्त्र, ग्रामीण विकास, लष्करी नेतृत्व, शैक्षणिक धोरण, लढवय्या बाणा, बालशिक्षण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंधश्रध्दा निमुर्लन, सामाजिक अनिष्ठ प्रथांना विरोध, राजकीय नेतृत्व, वस्त्रोद्योगास चालना, नदीवरील घाट, विहिर यांचे निर्माण, वसतीगृह निर्मिती, प्रशासन व्यवस्था या विषयावर माहिती देणारा किमान एक मिनिटाचा रिल तयार करुन स्वतःच्या फेसबुक, एक्स (व्टिटर), इन्स्टाग्राम, यु-टयुब आदी समाजमाध्यमांवर प्रसिध्द करावा.

विद्यापीठाने निर्देशित केलेल्या विषयांवर नियम व अटींचे पालन करुन स्पर्धकांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द केलेल्या रिलची लिंक muhsprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर दि. 22 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाकडे पाठविणे अनिवार्य आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विद्यापीठाचा 0253-2539176 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेत मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande