मुख्यमंत्री शिंदेंचे गुरुवारी नागपुरात
नागपूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी नागपुरात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी दुपारी 4.30 वाजता बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते विमानाने नागपूरला जाणार आहेत.
एकनाथ शिंदे


नागपूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी नागपुरात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी दुपारी 4.30 वाजता बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते विमानाने नागपूरला जाणार आहेत. नागपूर विमानतळावर संध्याकाळी 5.30 वाजता त्यांचे आगमन होईल. विमानतळाहून मुख्यमंत्री रामगिरी या शासकीय निवासाकडे प्रयाण करतील. मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी मुक्काम करणार असून त्यांचा तेथील वेळ राखीव असणार आहे.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande