चंद्रपूर: वंदे भारतच्या लोको पायलटचे आमदार जोरगेवारकडून स्वागत
चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। 'वंदे भारत' ट्रेनच्या 'लोको पायलट'चे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत केले. नागपुर ते सिकंदराबाद या “वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी उद्घाटन क
चंद्रपूर:वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलट चे अम्मा का टिफिन देत आमदार जोरगेवार यांच्या वतीने स्वागत..


चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। 'वंदे भारत' ट्रेनच्या 'लोको पायलट'चे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत केले. नागपुर ते सिकंदराबाद या “वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी उद्घाटन करण्यात आले. या निमित्त चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रेल्वेच्या यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफीन देत सन्मानित केले. यावेळी मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, रमणिक चव्हाण, विवेक खोके, अभिषेख गुप्ता, किरण नागपूरे, एस.एस मानकर, प्रसाद, रमेश राजूरकर, नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार, डाँ. गोपाल मुंदडा, यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande