जय मालोकार प्रकरणातील तीन तासांचा व्हीडीओ आला समोर
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर शासकीय विश्रामगृह येथे केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एका धाब्यावर पळून गेले होते. त्यानंतर तिथे मनसेचे पदाधिकारी जय माल
P


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर शासकीय विश्रामगृह येथे केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एका धाब्यावर पळून गेले होते. त्यानंतर तिथे मनसेचे पदाधिकारी जय मालोकार याची प्रकृती खराब झाल्यानंतर त्याला घटनेच्या तिन तासातच अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पळून गेल्यानंतर आणि रुग्णालयात आणण्याच्या जवळपास तीन तासांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे या तिन तासात नेमकं काय झालं, याचा तपास अकोला पोलिस करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध विधान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची यांची संतप्त मनसैनिकांनी तोडफोड केली होती. या तोडफोडीत सहभागी असलेले जय मालोकार यांचा या घटनेच्या काही तासानंतर मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू छातीत, मानेवर आणि डोक्यावर मारहाण झाल्याने झाला असल्याचं उघड झाल आहे. यानंतर अकोला पोलीस आता गाडी तोडफोड नंतर जय मालोकार हे कुठे कुठे गेले होते, याचाही तपास करीत आहे. त्याबरोबरच त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथील डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार असून तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासणार आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचा उल्लेख आहे. तर आता पोलीसही याची सखोल चौकशी करून फॉरेनसिकच्या मदतीने जय मालोकार यांचा मृत्यूच नेमकं कारण काय याचाही शोध पोलीस घेत आहेत. तर जय मालोकार तोडफोडीनंतर ज्या ज्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं याचेही काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. मनसेचे पदाधिकारी तोडफोड केल्यानंतर शहरातील एका धाब्यावर थांबले होते. तेथून ते एका पेट्रोलपंपावर गेले होते. त्याठिकाणी जय मालोकार अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला दुचाकीवर आणि नंतर एका ऑटोत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे हे त्यांच्या सोबत होते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याने पोलिस या सर्व प्रकरणाचा तपास वेगाने करीत आहे. या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहवे लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande