जळगावात दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. धरणगावात दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन
जळगावात दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार


जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. धरणगावात दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 आणि 13 वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर 10 व 11 सप्टेंबरच्या दरम्यान संशयिताने 2 वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. धरणगावमध्ये मध्य प्रदेशातील कुटुंब राहते. या कुटुंबात 11 व 13 वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी वास्तव्याला आहे. या परिसरात संशयित आरोपी विनोद बारेला हा देखील राहतो. या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी दिली. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande