जळगावात हवेत गोळीबार करून वाळू माफियाची दहशत
जळगाव, 19 सप्टेंबर (हिं.स.) जळगावात दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालने फोटो काढले म्हणून त्यावर हवेत गोळीबार करून वाळू माफियाने दहशत निर्माण केली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पाळधी प
जळगावात हवेत गोळीबार करून वाळू माफियाची दहशत


जळगाव, 19 सप्टेंबर (हिं.स.) जळगावात दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालने फोटो काढले म्हणून त्यावर हवेत गोळीबार करून वाळू माफियाने दहशत निर्माण केली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धरणगाव तालुक्यातील चांदसर या ठिकाणी होणारा अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. वाळू उपसा करण्यासाठी काही जण चाऱ्या बुजत असल्याची माहिती कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन त्यांना जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाळ कोळी यांनी त्याच्या जवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. गावात गोळीबाराचा आवाज झाल्याने धावपळ उडाली. माहिती मिळताच पारधी पोलीस गावात पोहोचले.

याप्रकरणी कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी ,मोहन गोविंदा कोळी ,कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी सर्व राहणार चांदसर तालुका धरणगाव व गोपाल कोळी व दीपक कोळी राहणार वाकटुकी तालुका धरणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे व सहकारी करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande