धुळे : हरविलेल्या इसमाची माहिती देण्याचे आवाहन
धुळे, 18 सप्टेंबर (हिं.स.): चाळीसगांव रोड, पोलीस स्टेशन धुळे मिसींग रजि.न.25/2024 दि.14 सप्टेंबर,2024 रोजी सौ.शारदा थोरात, पवन नगर, धुळे यांनी खबर दिली की, दि.12 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पती व मी जेवण केल्यावर माझे पती यांनी स
धुळे : हरविलेल्या इसमाची माहिती देण्याचे आवाहन


धुळे, 18 सप्टेंबर (हिं.स.): चाळीसगांव रोड, पोलीस स्टेशन धुळे मिसींग रजि.न.25/2024 दि.14 सप्टेंबर,2024 रोजी सौ.शारदा थोरात, पवन नगर, धुळे यांनी खबर दिली की, दि.12 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पती व मी जेवण केल्यावर माझे पती यांनी सांगितले की, मी थोडावेळ बाहेर जावून येतो असे सांगुन निघुन गेला आहे. त्यांचा आजुबाजुच्या परीसरात तसेच आमचे ओळखीचे नातेवाईक यांचेकडेस शोध घेतला असता ती आजपावेतो मिळून आला नाही.

इसमाची ओळख अशी : शिवाजी प्रल्हाद थोरात,वय 61 वर्ष, राहणार पवन नगर, पश्चिम हुडको, चक्कीसमोर,धुळे शरीरबांधा मध्यम, उंची 5 फुट 9 इंच, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, चेहरा लाबंट, अंगात निळया रंगाचा फुल बाहीचा शर्ट व पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात लाल व पांढऱ्या रंगाचे बुट शिक्षण नववी ,भाषा हिंदी, मराठी बोलतो. अशा वर्णनाचा इसम आढळुन आल्यास त्याची माहिती चाळीसगांव रोड पोलीस स्टेशन, धुळे येथे द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande