उत्तरप्रदेश : पुन्हा एकदा रेल्वे घातपाताचा प्रयत्न
रामपूरनजीक रेल्वे रूळांवर टाकला लोखंडी खांब रामपूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा रेल्वे घातपाताचा प्रयत्न झाला आहे. राज्यातील कानपूर, गाझीपूर, देवरियानंतर आता रामपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या कॉ
रामपूरनजीक रेल्वे रूळांवर टाकला लोखंडी खांब


रामपूरनजीक रेल्वे रूळांवर टाकला लोखंडी खांब

रामपूर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा रेल्वे घातपाताचा प्रयत्न झाला आहे. राज्यातील कानपूर, गाझीपूर, देवरियानंतर आता रामपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या कॉलनीच्या मागून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर लांब लोखंडी पोल ठेवण्यात आला होता. तेवढ्यात डेहराडून एक्सप्रेस तिथून जात होती. रेल्वे रुळावरील खांब पाहून लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला.

रेल्वे रुळावर खांब टाकल्याची माहिती मिळताच जीआरपी आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी ट्रॅकवरुन खांब हटवला, त्यानंतर ट्रेन पुढे निघाली. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. बळवंत एन्क्लेव्ह कॉलनीच्या मागून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर टेलिकॉमचा जुना 7 मीटर लांबीचा लोखंडी पोल ठेवण्यात आला होता.या घटनेची माहिती डेहराडून एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने स्टेशन मास्टर आणि जीआरपीला दिली. माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने रामपूरचे एसपीही जिल्हा पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. पथकाने खांब ताब्यात घेऊन रात्रीच शोधाशोध सुरू केली. गुरुवारी सकाळी पुन्हा अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच आसपासच्या लोकांकडून माहिती घेतली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande