नाशिक : शालेय कॅरम जिल्हा स्पर्धेत निखिल लोंढे, मुस्ताक शेख, अश्फाक शेख विजयी
नाशिक , 29 सप्टेंबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे नाशिक जिल्हा क्षेत्रातील शाळा आणि क
शालेय कॅरम जिल्हा स्पर्धा. निखिल लोंढे, मुस्ताक शेख आणि अश्फाक शेख विजयी.


नाशिक , 29 सप्टेंबर (हिं.स.)।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे नाशिक जिल्हा क्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालीन शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

१४ वर्षे मुले, १७ वर्षे आणि १९ वर्षे या तीन वयोगटाच्या मुलांच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत एकूण २१० खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. आजच्या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटामध्ये अंतिम लढतीत देवळालीच्या डॉ. सुभाष गुजर स्कुलच्या मुस्ताक शेख याने इगतपुरीच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या मोक्षमित मोदी याचा ५-१ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर पार्थ ठाकूर (डॉ. सुभाष गुजर स्कुल) याने तिसरा, आदित्य बोरकर (प्राथमिक विद्यामिनदीर,सिन्नर) चवथा, रेहान शेख ( महात्मा गांधी स्कुल,इगतपुरी) पाचवा तर तेजस खातळे याने सहावा क्रमांक मिळविला. १७ वर्षे मुलांच्या गटामध्ये डॉ. सुभाष गुजर स्कुलच्याच अशफाक शेख आणि युपदत्त शर्मा यांच्यातच अंतिम लढत झाली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत अशफाक शेखने ७-६ अश्या एक गुणाने हा सामना जिंकून विजेतेपद मिळविले. तर, युपदत्त शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या गटात निफाडच्या के. के. वाघ विद्याभवनच्या पार्थ अहिरे याने तिसरा क्रमांक मिळविला, विद्या इंटरनॅशनल, येवलाच्या अरहम शेखने चवथा, इगतपुरीच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या कृष्णा गोरे याने पाचवा आणि सिन्नरच्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या मोहित उघडे याने सहावा क्रमांक मिळविला. १९ वर्षे गटामध्ये सिन्नर येथील महात्मा जोतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी सुंदर कामगिरी करून पाहिले चार क्रमांक आपल्या नांवें केले. यामध्ये निखिल लोंढेने पहिला, यश खैरेने दुसरा, आत्माराम भटजीरे याने तिसरा आणि आदित्य लोंढे याने चवथा क्रमांक मिळवून या गटामध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. डॉ. सुभाष गुजर स्कुलच्या प्रथमेश भालेराव आणि प्रसाद भालेराव यांनी अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवून आपल्या शाळेला दुहेरी यश मिळवून दिले. या प्रत्येक गटातील पहिल्या सहा खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशनचे प्रतिनिधी आनंद खरे, भुषण भटाटे, अभिषेक मोहिते, नकुल चावरे, उत्कर्ष परदेशी, यश अहिरे, वेदांती पवार, भरत खत्री, दिपाली शिंदे आदीनी परिश्रम घेतले. उद्या १९ वर्षे गटाच्या मुले आणि मुलींच्या स्पर्धा खेलविल्या जाणार आहेत अशी माहिती या स्पर्धेच्या प्रमुख प्रीती करवा यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande