अस्मिता खेलो इंडिया वेस्ट झोन विमेन्स लीग राष्ट्रीय ज्युदो स्पर्धामहाराष्ट्राच्या शाम्भवी कदम आणि संस्कृती पाटील यांना सुवर्णपदकनाशिक, 4 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया)आणि खेलो इंडिया यांच्या अस्मिता खेलो इंडिया या उपक्रमाअंतर्गत आयोजित पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वुमन्स लीग ज्यूदो स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या खुल्या गटात गुजराथ, महाराष्ट्र, राजस्थानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी नोंदवली. आज खेळल्या गेलेल्या महिला खुल्या गटात ७८ किलो गटात महाराष्ट्राच्या शाम्भवी कदमने आणि ७८ किलोवरील गटात संस्कृती पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत गुजराथ संघाने ६६ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नांवे केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही सुंदर खेळ केला. परंतु त्यांना ६५ गुण मिळाल्यामुळे त्यांना केवळ एक गुणांच्या फरकाने सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला खुल्या गटात ७८ किलो गटात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शाम्भवी कदमने आक्रमक खेळ करत गुजराथच्या इवा देसाणी हीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. ७८ किलोवरील गटात महाराष्ट्राच्या संस्कृती पाटीलने गुजराथच्या पौर्णिमा झा हीला पराभूत करून सुवर्णपदक मिळावीले. ४८ किलो गटात राजस्थानच्या शावणी घोघर हीने सुवर्णपदक, मध्य प्रदेशच्या समोनी सेन हीने रजत पदक तर दीपिका सादू आणि हरल साहिया ( दोघीही गुजराथ) यांनी कास्य पदक मिळविले. ५२ किलो गटात छत्तीसगडच्या रंजिता करोट हीने सुवर्णपदक तर महाराष्ट्राच्या वैष्णवी पाटील हीने रजत पदक मिळविले, तर संजना शिंदे(महाराष्ट्र आणि संध्या तिवारी(मध्य प्रदेश) यांना कास्य पदक मिळाले ५७ किलो गटात गुजराथच्या रहिता कारेलिया आणि सुहाना शेख यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रजत पदक मिळविले तर समृद्धी पाटील(महाराष्ट्र) आणि पायल जडेजा यांनी कास्य पदक मिळविले. ६३ केली गटातही गुजराथच्या तृषाबेन झाला आणि मयुरी पापरोत्तर यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रजत पदक मिळविले तर साक्षी मुकादम (महाराष्ट्र) आणि इशिता राठोरे(राजस्थान) यांनी कास्य पदक मिळविले. या स्पर्धेत चार वयोगटात खेळल्या गेलेल्या सामन्यातील मिळविलेल्या गुणांनुसार सर्वसाधारण विजेते , उपविजेते आणि तिसरा क्रमांक ठरविण्यात आला. यामध्ये गुजराथला विजेतेपद, महाराष्ट्राला उपविजेटपद आणि राजस्थानला तिसरा क्रमांक मिळाला. या स्पर्धेत विजेत्या संघांना प्रमुख पाहुणे ज्युदोचे माजी राष्ट्रीय खेळाडू गोविन्द भट्टड, डॉ. रत्नाकर पटवर्धन, राज्य ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, सरचिटणीस शैलेश टिळक, योगेश धाडवे, रवींद्र मेटकर, योगेश शिंदे, विजय पाटील यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि पहिल्या तीन क्रमांकाच्या सर्व खेळाडूंना मेडल आणि रोख रक्कम रुपये ४ लाख सव्वीस हजार रुपये प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजराथ, गोवा, मध्य प्रदेश आणि दीव - दमण अश्या सात राज्यांच्या ८९४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय भोसले, शैलेश टिळक, योगेश धाडवे, रवींद्र मेटकर, योगेश शिंदे, विजय पाटील, स्वप्नील शिंदे, सुहास मैंद, ऋषिकेश वाघचौरे आणि सहकारी आणि राष्ट्रीय पंच, पदाधिकारी परिश्रम घेतले. अंतिम निकाल -१) गुजराथ संघ - सर्वसाधारण विजेतेपद ( एकूण ६६ गुण)२) २) महाराष्ट्र संघ - सर्वसाधारण उप विजेतेपद ( एकूण ६५ गुण)३) राजस्थान संघ - सर्वसाधारण तिसरा क्रमांक ( एकूण ४४ गुण)
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI