परळीत वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन
परळी, 14 जानेवारी (हिं.स.)।बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला महिना उलटून गेला. दरम्यान, या प्रकऱणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. वाल्मीक कराड यांना सहआरोपी करा या मागणी
परळी


परळी, 14 जानेवारी (हिं.स.)।बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला महिना उलटून गेला. दरम्यान, या प्रकऱणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. वाल्मीक कराड यांना सहआरोपी करा या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील जलकुंभावर चढून आंदोलन केले होते. याच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी ( दि.१४ ) वाल्मीक कराड समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा देवमाणूस असल्याचे म्हणत वाल्मिक कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं आहे. वाल्मिक कराड समर्थक हे राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढल्याचे पाहायला मिळाले तर यापैकी एकाला भोवळ आल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड आणि कराड समर्थकांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहे.आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

याचसोबत शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा,आमदार सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा बजरंग सोनवणे, मनोज जरांगे यांनी परळी शहराची बदनामी सुरू केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आक्रमक आंदोलकांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ ठिय्या दिला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जातीय व राजकीय द्वेषातून कारवाई न करता नि:पक्षपणाने चौकशी करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande