राणा दाम्पत्याने पतंग उडवून साजरी  केली मकर संक्रांती  
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी अमरावती येथे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमान गढी येथील मैदानावर पतंग उडवून मकर संक्रांतीचा सण साजरा केला. दरवर्षी राणा दाम्पत्य मकर संक्रांतीच्या पर्वावर यु
रणांच्या हनुमानगढीत रंगला पतंग महोत्सव  आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पतंग उडवून केली मकर संक्रांती साजरी..


अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी अमरावती येथे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमान गढी येथील मैदानावर पतंग उडवून मकर संक्रांतीचा सण साजरा केला. दरवर्षी राणा दाम्पत्य मकर संक्रांतीच्या पर्वावर युवा स्वाभिमान पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भव्य पतंग उडवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात.. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाच्या तर आमदार रवी राणा हे स्वाभिमान पक्षाच्या नावाची पतंग उडविली... सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन एकमेकां सोबत गोड गोड बोलावे असे आवाहन नवनीत राणा यांनी केले. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात भरभराटी व विकासाची उंच भरारी घेईल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.या वेळी मेळघाट चे लोकप्रिय आमदार केवलराम काळे हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande