महाकुंभात पहिल्या दिवशी1.50 कोटी भाविकांनी केले स्थान
प्रयागराज, 13 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आज, सोमवारपासून महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी गंगा-यमुना- सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात दिवसभरात 1.50 कोटी भाविकांनी स्थान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या
महाकुंभात पहिल्या दिवशी 1.50 कोटी भाविकांनी केले स्थान


प्रयागराज, 13 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आज, सोमवारपासून महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी गंगा-यमुना- सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात दिवसभरात 1.50 कोटी भाविकांनी स्थान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. आगामी 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात सुमारे 45 कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता उत्तरप्रदेश प्रशासनाने व्यक्त केली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकृत सोशल ट्विटर हँडलवरून (एक्स) महाकुंभ मेळ्याचे अपडेट शेअर केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेच्या पवित्र पर्व असलेल्या ‘महाकुंभ 2025’ मध्ये 'पौष पौर्णिमे'च्या शुभ प्रसंगी संगमात स्नान करण्याची संधी मिळालेल्या सर्व संत, कल्पवासी, भक्तांचे हार्दिक अभिनंदन. तब्बल 144

वर्षांनी दुर्मिळ संयोग जूळून आलेल्या ‘महाकुंभमेळा 2025’ ची सुरुवात आज प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने झाली. आज पहिल्या स्नान महोत्सवात, 1.50 कोटी भक्तांनी अखंड आणि स्वच्छ त्रिवेणीत स्नान करण्याचा लाभ घेतला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच महाकुंभमेळा प्रशासन, प्रयागराज प्रशासनाने पहिला स्नान महोत्सव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात सहभाग नोंदवला. याबद्दल राज्याचे पोलीस, महाकुंभ संबंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व विभाग, प्रयागराज महापालिका, स्वच्छाग्रही, गंगा सेवादूत, कुंभ सहाय्यक, धार्मिक-सामाजिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था आणि माध्यम जगतातील मित्रांचा समावेश असून त्यांचे आभार मानत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande