छत्रपती संभाजीनगर , 14 जानेवारी (हिं.स.)। 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून कुंभमेळा विशेष रेल्वे निघणार आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून 19 फेब्रुवारी रोजी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर-पाटणा ही विशेष रेल्वे 19, 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता सुटेल.
जालना, सेलू, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूरमार्गे पाटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल. परतीसाठी पाटणा ते छत्रपती संभाजीनगर विशेष रेल्वे पाटणा येथून 21 आणि 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच संभाजीनगर येथे पोहचणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode