प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्यासाठी निमंत्रितांमध्ये मुंबईतील पाच विशेष पाहुणे
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.) - नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ येथे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलन पाहण्यासाठी मुंबईतील पाच विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून एकूण
प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्यासाठी निमंत्रितांमध्ये मुंबईतील पाच विशेष पाहुणे


मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.) -

नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ येथे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलन पाहण्यासाठी मुंबईतील पाच विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून एकूण 10,000 खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून मुंबईतील पाच निमंत्रितांसह महाराष्ट्रातील एकूण 23 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबई विभागातील विशेष पाहुण्यांमध्ये पीएम यशस्वी योजनेंतर्गत निमंत्रित अतुल हनुमंत जाधव (अँटॉप हिल) आणि वैभव नितीन पाटील (वसई पश्चिम), महाराष्ट्र वस्त्रोद्योग (हस्तकला) श्रेणी अंतर्गत निमंत्रित ब्रह्मदेव पंडित (शिल्पगुरू आणि पद्मश्री) आणि अभय ब्रह्मदेव पंडित (राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित), दोघेही भाईंदर पूर्व, कलाकार निवास येथील आहेत, आणि महाराष्ट्र महिला आणि बालविकास (हस्तकला) श्रेणी अंतर्गत आमंत्रित उज्वला सदाशिवराव पाटील, सहाय्यक आयुक्त, अंगणवाडी (बदलापूर पश्चिम) यांचा समावेश आहे. हे विशेष पाहुणे भारतातील विविध घटकांमधील आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा तसेच सरकारी योजनांचा सर्वोत्तम वापर केलेल्यांचा यात समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande