सीआयएसएफच्या 2 नवीनबटालियन्सना मान्यता
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी (सीआयएसएफ) 2 नवीन बटालियनना मान्यता दिली आहे. या प्रत्येक बटालीयनमध्ये 2 हजारांहून अधिक कर्मचारी असतील. या निर्णयामुळे सीआयएसएफच्या क्षमतेसह राष्ट्रीय सुरक्
सीआयएसएफ-लोगो


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी (सीआयएसएफ) 2 नवीन बटालियनना मान्यता दिली आहे. या प्रत्येक बटालीयनमध्ये 2 हजारांहून अधिक कर्मचारी असतील. या निर्णयामुळे सीआयएसएफच्या क्षमतेसह राष्ट्रीय सुरक्षा देखील अधिक मजबूत होणार आहे.

सीआयएसएफची स्थापना 1969 मध्ये झाली होती. हे सुरक्षा दल देशातील 68 नागरी विमानतळांना सुरक्षा पुरवते. तसेच सीआयएसएफकडे भारताच्या अणु प्रकल्प आणि अवकाश क्षेत्राशी संबधीत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. ताजमहाल आणि लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंना दहशतवादविरोधी सुरक्षा प्रदान करण्याचेही काम सीआयएसएफकडेच आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयासंदर्भात सीआयएसएफचे महानिरीक्षक अजय दहिया म्हणाले की, ‘नवीन बटालियनना मान्यता मिळाल्याचा आनंद आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. कर्मचाऱ्यांना आठवड्याची सुट्टी तसेच रजा मिळण्यात अडचण होणार नाही. ‘गृह मंत्रालयाने 2 नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी देऊन सीआयएसएफच्या महत्त्वपूर्ण विस्ताराला मान्यता दिली आहे. हा निर्णय आणि अलिकडेच मंजूर झालेल्या महिला बटालियनसह सीआयएसएफची क्षमता वाढणार आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल. 2000 हून अधिक व्यक्तींसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.’ असे ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या अखेरीस सीआयएसएफच्या महिला बटालियनला मान्यता देण्यात आली होती. महिलांचे प्रमाण 7 टक्के आहे.सीआयएसएफमध्ये सध्या 12 राखीव बटालियन आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये 1,025 कर्मचारी आहेत.नवीन बटालियन अंतर्गत सुरक्षेशी संबंधित तात्काळ गरजा पूर्ण करणे तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा एक समूह तयार करून सीआयएसएफच्या ‘वाढत्या’ मागण्यांची पुर्तता करणे त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. ------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande