सोलापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन  पकडला चोरटा
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)। मागील वर्षभरात साथीदारांसोबत मंगळवेढा शहर, बठाण, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरज अशा ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अशोक ऊर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखे
सोलापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन  पकडला चोरटा


सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)।

मागील वर्षभरात साथीदारांसोबत मंगळवेढा शहर, बठाण, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरज अशा ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अशोक ऊर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण १९ लाख २८ हजार ५०० रुपयांचे जवळपास २८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना घरफोडीतील रेकॉर्डवरील अशोक ऊर्फ आशिकाऱ्या काळे मोहोळ येथे आल्याची खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे पथकाने सापळा रचून अनगर परिसरातून त्यास पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली, त्यावेळी सात-आठ महिन्यांपूर्वी त्याने साथीदारांसोबत मंगळवेढा शहरात रात्री घरफोडी केल्याचे सांगितले. आशिकाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध दाखल मंगळवेढा, टेंभुर्णी व सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील प्रत्येकी तीन, मोहोळ पोलिस ठाण्यातील चार, मंद्रूप पोलिसांतील एक तर अक्कलकोट उत्तर पोलिसांतील दोन, अशा एकूण १६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande