आजपासून मोर्शी तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र होणार सुरू ! मोर्शी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ! 
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) मोर्शी तालुक्यात दापोरी हिवरखेड परिसरामध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली होती परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आजपासून दापोरी हिवरखेड परिसरामध्ये
आजपासून मोर्शी तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र होणार सुरू !   मोर्शी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा !


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

मोर्शी तालुक्यात दापोरी हिवरखेड परिसरामध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली होती परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आजपासून दापोरी हिवरखेड परिसरामध्ये पांडव जिनिंग प्रेसिंग इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड कंपनी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनाने कापसासाठी जो काही हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करण्यात येत असल्यामुळे नक्कीच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.

मोर्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे लागवड होते. परंतु जर आपण यावर्षी कापसाची स्थिती बघितली तर अत्यंत कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परंतु आता मोर्शी तालुक्यात दापोरी हिवरखेड परिसरामध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आता आनंद व्यक्त केला जात आहे.

मोर्शी तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरात कपाशीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होते व यावर्षी कपाशीचे पीक चांगले आले असताना खाजगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मात्र शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत होता. परंतु आता शासकीय हमीभाव केंद्र सुरू केल्यामुळे खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दरात निश्चित वाढ केली जाईल अशी एक शक्यता आहे. दापोरी परिसरामध्ये सीसीआय अंतर्गत कापसाचे खरेदी केंद्र सुरू केल्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande